बीड -माझ्या सोबत कोणी राहील नाही ही चर्चा होती, आता उघडा डोळे आणि बघा नीट हे दृश्य.बीड मतदारसंघाने नेहमी आपल्या पाठीशी उभ राहण्याच काम केलं. मला तिकीट नाही अशी चर्चा महिनाभर होती. मागच्यावेळी आपण आशीर्वाद दिला आणि यावेळी सुद्धा विश्वास दाखवला. आपले आभार.
बीड विधानसभा मतदारसंघात आ संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारर्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
या पाच वर्षात मी काय केलं हे विरोधक विचारतात. एक वर्षच्या सत्तेत नॅशनल हायवे असो कि स्टेट हायवे आपण गडकरी साहेबाना सांगून मंजुरी मिळवून दिली. सिव्हिल हॉस्पिटल, रेस्ट हाऊस, कलेक्टर ऑफिस या इमारती उभ्या केल्या. गजानन कारखाना पुन्हा सुरु केला. 2700रुपये भाव दिला.
सत्ता कि साहेब यात मी साहेबांना निवडलं. मी भूमिकेसोबत राहिलो. मला याचा फटका देखील बसला. अनेक प्रस्ताव प्रलंबित ठेवले गेले. टुकूर प्रकल्प असो कि इतर मी प्रस्ताव दिले पण मंजुरी अडवली गेली.मुबलक पाणी असूनही पाणी मिळतं नाही कारण मी सत्तेत नाही.गेल्या दोन वर्षात राक्षसी वृत्ती सत्तेवर बसली, त्याचा फटका मला बसला. रावणाला दहन करण्यासाठी पवार साहेब तयार आहेत.
आरक्षणाच्या मुद्यावर आम्हाला कुठंच अडवलं नाही. आता कस जरांगे पाटील म्हणतील तस. तुम्ही माझ्या जातीला न्याय दिला. सुईच्या टोकाऐवढी जात असताना तुम्ही न्याय दिला. आशीर्वाद द्या. असे आवाहन संदीप क्षीरसागर यांनी केले.
Leave a Reply