बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला उपचारासाठी हलविण्यात आले.मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
युवराज राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply