परळी -बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यापारी हैराण झाले आहेत. दहशतिखाली वावरत आहेत. ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला असं म्हणत अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा अन राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन खा शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची परळी येथे जाहीर सभा झाली. या सभेला बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा पवार यांनी कृषिमंत्री तथा अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.काही वर्षांपूर्वी पंडित अण्णा मुंडे त्यांच्या मुलाला धनंजय ला घेऊन माझ्याकडे आले, आम्हाला तुमची मदत हवी आहे असं म्हटले, त्यांना संकट काळात मी मदत करण्याचा शब्द दिला. त्यांना विधानपरिषद मध्ये संधी दिली.
विरोधीपक्ष नेतेपद दिले, त्यानंतर मंत्रिमंडळात संधी दिली. मात्र काही वर्षपूर्वी त्यांनीच आमचा पक्ष फोडला. धोका दिला. असं म्हणत या गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा. असे आवाहन पवार यांनी केले.
बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये गुंडगिरी खूप वाढली आहे. इथले व्यापारी दहशतिखाली गाव सोडून गेले आहेत. ही गुंडगिरी संपवण्याचे काम तुमच्या हातात आहे. या गुंडाना पोसणाऱ्या लोकांना पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Reply