बीड -राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बीफ जिल्ह्यात शनिवारी तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. आष्टी, परळी आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता बीड येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पवार हे बीडला मुक्काम करणार आहेत. पवारांच्या मुक्कामात बीड जिल्ह्याची गणित बदलणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत सध्या तारीख राज्यात दिसत आहे. सर्वच नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यात पवार हे शनिवार पासून सभाचा धुरळा उडवणार आहेत.
शनिवारी त्यांच्या आष्टी, परळी आणि बीड येथे सभा होणार आहेत. यातील बीडची सभा सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे होणार आहे. बीडचे एकनिष्ठ आ संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
या सभेनंतर पवार हे बीड येथे मुक्काम करणार आहेत. निवडणूक काळात पवार बीडला मुक्काम करतात हा आजवरचा इतिहास आहे. त्यांच्या मुक्कामानंतर ते जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलतात हे देखील सर्वश्रुत आहे.
पवार शनिवारी बीड येथे मुक्कामी असल्याने 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊन सर्वच्या सर्व जागा पवार निवडून आणण्यासाठी काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply