अंबाजोगाई -माझ्याविरोधात उभे असलेल्या उमेदवारांच्या नेत्याला लग्नासाठी पोरगी मिळतं नाहीये अन हे मतदारसंघातील मुलांचे लग्न लावून देण्याच्या बाता मारत आहेत असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी उमेदवाराची खिल्ली उडवली. धनुभाऊ तुम्ही राज्यात फिरा आम्ही तुमच्या विजयासाठी मेहनत घेतो असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
परळी मतदारसंघाच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी जिल्हा परिषद गटात विविध गावांमध्ये बुधवारी दिवसभर धनंजय मुंडे यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात राडी, दैठणा मुडेगाव, राडी तांडा येथे कॉर्नर बैठका घेतल्या; तर सायंकाळच्या सत्रात धानोरा बुद्रुक, तडोळा व अकोला या गावांमध्ये कॉर्नर बैठका घेतल्या. या सर्वच गावांमधून धनंजय मुंडेंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, प्रत्येक कॉर्नर बैठकीला अगदी जाहीर सभेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले.
माझी जात आणि धर्म हा विकास आहे. आम्हाला स्वर्गीय मुंडे साहेब व स्वर्गीय पंडित अण्णा यांनी सर्वसमावेशक विकासाचे राजकारण शिकवले. या मातीतील माणसाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी मी माझे आयुष्य समर्पित केले आहे. इथल्या विकासाच्या प्रत्येक विटेमध्ये आणि इथल्या माणसाच्या सुख-दुःखामध्ये मी कायम वाटेकरी आहे. त्यामुळे मांजरापट्ट्यातील या भागातून मला भरभरून मतदान रुपये आशीर्वाद मिळेल असा मला विश्वास असल्याचे धनंजय मुंडे यांनी या बैठकांमधून व्यक्त होताना सांगितले.
धनंजय मुंडे हे राज्याचे नेतृत्व असून, तुम्ही आता संपूर्ण राज्यात पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात फिरावे. परळी विधानसभा मतदारसंघात तुमचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःची निवडणूक समजून लढेल. तुम्ही या निवडणुकीची जबाबदारी आमच्यावर सोडा आणि बिनधास्त सबंध महाराष्ट्रात फिरा, असा विश्वास यावेळी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
गावागावात आगमन होताच स्थानिक गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात कुठे बँड लावून, कुठे फटाके फोडून तर कुठे महिला भगिनींच्या हस्ते औक्षण करून धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. गावात आगमन होताच धनंजय मुंडे यांनी त्या त्या गावातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादनही केले.
सकाळच्या सत्रात मा. आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते दत्ता पाटील, गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे, विलास काका सोनवणे, बी सी गंगणे, रणजीत लोमटे, गणेश कराड, तानाजी देशमुख, नरसिंह कदम, प्रदीप भैय्या पाटील, गणेश राव जाधव, दत्ताभाऊ गंगणे, उस्मान साहेब शेख, बालासाहेब गंगणे, शरद पाटील, अजितदादा गरड, मेघराज सोमवंशी, मनोज गंगणे, सुभाष बनसोडे, दगडू बनसोडे, विलास पाटील, हनुमंत आप्पा कोळगिरे, सुधाकर काळुंखे, रघुनाथ जोगदंड, हनुमंत गायकवाड, सतीश गंगणे, रावसाहेब आडे, राजाभाऊ लोमटे, गणेश देशमुख, विठ्ठल जाधव, सचिन बनसोडे, वजीर पठाण, कादर खान पठाण, महबूब शेख, प्रभाकर गंगणे, अख्तर जहागीरदार, हाजी शेख, संदिपान कांबळे, काशिनाथ वाघमारे, अमर कोळगिरे, सिद्धेश्वर कोळगिरे, त्याचबरोबर मुढेगाव येथे लक्ष्मण बापू जगताप, विलास जगताप, प्रवीण जगताप, बाळू तात्या जगताप, राडी तांडा येथे रावसाहेब आडे यांच्यासह काशिनाथ आडे, काशिनाथ राठोड, तसेच सायंकाळच्या सत्रात धानोरा बुद्रुक येथे आबासाहेब पांडे, मेघराज सोमवंशी, विश्वास पाटील, तुषार फुलाने, प्रशांत चिवडे, सुधाकर काळुंखे, विनोद भारती, बिबीशन चिवडे, श्रीकांत सोमवंशी, नवनाथ हातांगळे, नवनाथ काळुंके, रामराव मुळे, तडोळा येथे वसंतराव कदम, बिभीषण कदम, एकनाथ कातळे, अकोला येथे सुदाम आगळे, श्रीनिवास आगळे, वसंतराव आगळे, भारत आगळे, भारत बरकते, गुणवंत आगळे, राखी अंधारे, सुदाम आगळे, यांसह गावागावातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply