बीड -राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या शनिवारी बीड येथे प्रचार सभा होणार आहे. जिल्ह्यातील एकमेव एकनिष्ठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पवार बीडला येणार आहेत. या संदर्भात आयोजित कार्यकर्ता बैठकीत आ क्षीरसागर यांनी सभेच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
९ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड येथे सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.५) रोजी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची राष्ट्रवादी भवन, बीड येथे बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचा महाविकास आघाडीचे, बीड विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार असलेले आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.५) रोजी मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले.
तसेच प्रचार व इतर सर्व महत्त्वाच्या बाबींवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply