बीड- देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी आ सुरेश धस यांना वाचवण्यासाठी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महासंचालक प्रयत्न करत असल्याचा आरोप फिर्यादी राम खाडे यांनी केला आहे.खाडे यांनी अप्पर मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हिंदू देवस्थानच्या जमिनी भूखंड माफियांनी गिळंकृत करत कोट्यावधींचा घोटाळा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली होती. त्यांच्या तक्रार आणि याचिकेवरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीड लाचलुचपत विभागाने भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ आणि इतरांवर २९ नोव्हेंबर २०२२ रोजी जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता.
मात्र नंतर या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरो, महसूल विभाग आणि पोलिसांकडून कुठलाच तपास केला जात नाहीये. (Bjp) सुरेश धस हे भाजपचे आमदार असल्याने गृहमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना अभय देत आहेत, असा गंभीर आरोप खाडे यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक निकेश कौशिक हे धस यांना वाचविण्यासाठी तपासात हस्तक्षेप करुन आरोपींना सुटण्यासाठी मदत करीत आहेत.
आपल्या तक्रार अर्जात खाडे यांनी म्हटले आहे की, आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमीन बनावट खालसा आदेश प्रकरणात हिंदू व मुस्लीम (वक्फ) च्या इनाम जमीन आहेत. वक्फ मंडळाने ३ प्रकरणात पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हे दाखल करुन त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरु केली आहे.
यामधील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली होती. यामधील हिंदु ८ देवस्थान इनाम जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल होत नसल्यामुळे मी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केलेले होते. त्यांच्या आदेशान्वये मा. उपअधिक्षक एन्टीकरप्शन ब्युरो बीड यांना कारवाईचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार आष्टी पोलीस स्टेशन येथे २९ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल झालेला असून त्यामधील निष्पन्न झालेल्या ३८ पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही. वक्फच्या इनाम जमिनीतील आरोपी व हिंदु देवस्थान इनाम जमिनीतील आरोपी व रॅकेटमधील सुत्रधार एकच असून वक्फ प्रकरणात त्यांना अटक होती व हिंदु देवस्थान इनाम जमिन प्रकरणात अटक किंवा चौकशीसाठी ताब्यात घेतले जात नाही हे विशेष. वास्तविक या प्रकरणातील मुख्य सुत्रधार धस हे विधान परिषद सदस्य असून ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे देवेंद्र फडवणीस हे या आरोपींना अभय देत आहेत व तपासावर दबाव आणत आहेत.
१ हजार कोटीच्या देवस्थान इनाम जमीन घोटाळा प्रकरणात सर्व पुरावे देवूनही संगनमताने झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणात पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन एकामेकांवर जबाबदारी ढकलून कारवाई टाळत आहेत. हेतुपुरस्कार विलंब करुन आरोपींना पुरावे नष्ट करण्यास व तक्रारदारावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत.
लाचलुचपत विभागाचे बीड येथील उपअधिक्षक यांच्याकडून तपास होत नसेल तर या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिका-याकडे देण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक मुंबई यांनी का दिले नाहीत ? या प्रकरणात एक सक्रीय रॅकेट कार्यरत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. हे रॅकेट कोणी शोधून काढायचे ? यामधील मुख्य सुत्रधार कोणी शोधायचा व कसा शोधायचा याचे मार्गदशन वरिष्ठ कार्यालयाने केले का ?
या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोची भुमिका संशयास्पद असून चौकशी होत नसेल किंवा ते चौकशीसाठी समर्थ नसतील तर हे प्रकरण ईडीकडे वर्ग का केले नाही ? याची चौकशी करण्यात यावी व तपासातील दिरंगाई व आरोपी ना होत असलेली मदत लक्षात घेता निकेश कौशिक महासंचालक अँटी करप्शन ब्युरो, मुबई यांना सह आरोपी करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, असे देखील खाडे यांनी या तक्रार अर्जात नमूद केले आहे.
Leave a Reply