News & View

ताज्या घडामोडी

images 16 2024 01 02T210720.790

कार्यकारी अभियंता तोंडेना नोटीस!

बीड -सार्वजनिक बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांना जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यपाल यांच्या दौऱ्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा पंधरा दिवसापूर्वी बीड येथे दौरा झाला. राज्यपालसारख्या महत्वाच्या व्यक्ती जिल्हा दौऱ्यावर येतात तेव्हा सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठराविक जबाबदारी असते.

राधाकृष्णन हे बीड येथे आले तेव्हा त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. न्यूज अँड व्यूज राज्यपाल यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी जी आसन व्यवस्था केली गेली होती त्यात अक्षम्य चुका होत्या.

ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांना कारणे दखावा नोटीस बजावली आहे अशी माहिती न्यूज अँड व्यूजच्या सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *