आष्टी -विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी एबी फॉर्म सह अर्ज दाखल केला. त्यामुळे येथील अजित पवार गटाचे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. मात्र आजबे यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या एबी फॉर्म सहित अर्ज भरल्याने अधिकृत उमेदवार कोण, महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार हे चित्र आहे. उमेदवारी जाहीर करण्याच्या दृष्टीने प्रचंड ओढाताण सुरु होती. बीड आणि आष्टी मतदार संघात शेवटपर्यंत महायुती कडून उमेदवार कोण हे फायनल नव्हते.
आष्टीतून एक दिवस अगोदर सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी एबी फॉर्म सहित अर्ज भरला. त्यामुळे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती.
दरम्यान मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब आजबे यांनी पक्षाच्या एबी फॉर्म सहित अर्ज भरला. त्यांनी त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत एबी फॉर्म देखील दाखवला, त्यामुळे या ठिकाणी महायुती मध्ये नेमकं कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Leave a Reply