बीड – महायुतीमध्ये बीड जिल्ह्यात एकमेव असलेल्या बीड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत कोण उमेदवार असणार यावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला.
बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यांची उमेदवारी फायनल होईल असे वाटतं होते.
उमेदवारी अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना देखील कोणीच फायनल ना झाल्याने अनेकांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर केळी गेली.
अखेर रात्री दोन वाजता डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नावाने अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला आणि सगळा सस्पेन्स संपला.
पक्षाचा विश्वास सार्थ ठरवू – डॉ योगेश
महायुती मधील सर्वच नेत्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आपण तो सार्थ ठरवू, विजयश्री खेचून आणू असा विश्वास उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फोन योगेश क्षीरसागर यांनी न्यूज अँड व्यूज शी बोलताना व्यक्त केला.
अनिल जगताप अपक्ष लढणार
दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते अपक्ष म्हणून मैदानात कायमच राहणार आहेत.
Leave a Reply