News & View

ताज्या घडामोडी

images 49

आष्टीत सुरेश धस,माळशिरस मध्ये राम सातपुते!

मुंबई -भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी कट करून सुरेश धस यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. माळशिरस मतदारसंघातून आ राम सातपुते यांना संधी दिली आहे.

महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून आष्टीच्या जागेवरून वाद सुरु होता. या ठिकाणी विद्यमान आ बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटाकडून असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता होती.

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. धस यांना आष्टीतून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपने गेवराई मतदारसंघ अजित पवार गटाला दिला.

तरीदेखील धस यांच्याबाबत निर्णय होतं नव्हता. अखेर सोमवारी धस यांनी आपला उमेदवारी अर्ज वाजत गाजत दाखल केला. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

1000764356
1000764357

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *