बीड – महानंद डेअरीचे माजी चेअरमन सहकार आणि शिक्षण क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून अपहार प्रकरणात फरार होते.
पाटोदा तालुक्यातील महात्मा फुले अर्बन बँक, वेगवेगळ्या सहकारी सोसायटी, शाळा संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रामकृष्ण बांगर, त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर, मुलगा बाळा उर्फ विजय बांगर यांच्यासहित कर्मचाऱ्यांवर देखील पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
सत्यभामा बांगर यांना अटक झाल्यानंतर पोलीस रामकृष्ण बांगर यांच्या शोधासाठी फिरत होते. संभाजीनगर पुणे मुंबई या भागात पोलिसांनी शोध घेतला होता.
दरम्यान बांगर हे वाशिम मध्ये एका हॉटेलवर लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगर यांना अटक केली आहे.
Leave a Reply