News & View

ताज्या घडामोडी

ANI 20241024073850

काँग्रेसीची यादी जाहीर!

मुंबई -अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून, ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड विधानसभा मतदारसंघातून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चिमूर विधानसभा मतदारसंघातून तसेच ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

गेली अनेक दिवस शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जोरदार तंटा सुरू होता. विशेषत: विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर दोन्ही पक्षांत खेचाखेची सुरू होती. काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांच्यात तर काही जागांवरून अक्षरश: शाब्दिक युद्ध झाले. त्यामुळे जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडूनही अंतिम समीकरण निश्चित होत नव्हते. महाविकास आघाडी तुटतेय की काय? अशा चर्चाही यामुळे झाल्या. अशा सर्व कारणांमुळे अखेर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यानंतर उमेदवार फायनल करण्यात आले.

१) बाळासाहेब थोरात-संगमनेर
२) नाना पटोले-साकोली
३) विजय वडेट्टीवार-ब्रह्मपुरी चिमूर
४) पृथ्वीराज चव्हाण-कराड
५) नितीन राऊत-नागपूर उत्तर
६) विश्वजीत कदम-पलूस कडेगाव
७) सुनील केदार-सावनेर
८) अमित देशमुख-लातूर ग्रामीण
९) अस्लम शेख-मालाड पश्चिम
१०) अमीन पटेल-मुंबादेवी
११) केसी पाडवी-अक्कलकुवा
१२) यशोमती ठाकूर-तिवसा
१३) संग्राम थोपटे-भोर
१४) संजय जगताप-पुरंदर
१५) लहू कानडे-श्रीरामपूर
१६) कुणाल पाटील-धुळे ग्रामीण
१७) अमिक झनक-रिसोड
१८) धीरज देशमुख-लातूर ग्रामीण
१९) ऋतुराज पाटील- कोल्हापूर दक्षिण
२०) जयश्री जाधव-कोल्हापूर उत्तर
२१) पी एन पाटील-करवीर
२२) कैलास गोरंट्याल-जालना
२३) विक्रम सावंत- जत
२४) शिरीष नाईक-नवापूर
२५) राजेश एकाडे-मलकापूर
२६) रणजीत कांबळे- देवळी
२७) सुरेश वर्पूरडकर-पाथरी
२८) सुरेश कोपरकर-भांडूप पश्चिम
२९) सहस्राम कोरोटे-आमगाव
३०) नसीम खान-चांदिवली
३१) डॉ. ज्योती गायकवाड- धारावी
३२) राजेंद्र गावित-शहादा
३३) किरण तडवी- नंदूरबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *