बीड -बीड नगर पालिकेत प्रशासक राज सुरु असून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन चा लाभ अधिकारी घेत आहेत. नीता अंधारे या नगदी असल्यासच फाईल ला हात लावतात हे अनेकवेळा चर्चीले गेले. दरम्यान नगर पालिकेच्या शाखा अभियंता असलेल्या अखिल फारोकी याने तब्बल नऊ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.
बीड नगर पालिकेत नीता अंधारे बोलें अन प्रशासन हले अशी अवस्था आहे. बोगस कामे करा, वाढीव बिले सादर करा फक्त टक्केवारी द्या अन बिल काढून घ्या असा धंदा अंधारे अँड कंपनीने सुरु केला आहे.
नगर पालिकेत बांधकामं परवानगी घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात अशा तक्रारी यापूर्वी अनेकदा झाल्या. मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांची मिलिभगत असल्याने कोणीच याकडे लक्ष देत नव्हते.
नगर पालिकेत महिनाभरपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सलीम याच्या बाबत तर अनेक तक्रारी होत्या मात्र अंधारे यांचा आशीर्वाद असल्याने त्याकडे कानाडोळा केला गेला.
दरम्यान बुधवारी बांधकामं परवानगी मिळावी यासाठी तब्बल बारा लाख रुपयांची लाच शाखा अभियंता अखिल फारोकी आणि कुरमुरे नमक सहकारी यांनी मागितली होती. तडजोडी अंती नऊ लाख रुपये देण्याचे ठरले.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी नऊ लाख रुपयांची लाच घेताना फारोकी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली.
Leave a Reply