जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा दणका!
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु असताना आपले कर्तव्य सोडून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्यूजला दिली आहे.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या दोघांवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.अक्षय भागवत आणि अकबर पटेल अशी त्या दोघांची नावे आहेत.
राज्यात विधानसभा निवडणूक जाहिर झाली आहे. आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहिर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय विश्रामगृह सील केले आहेत. बीडचे विश्रामगृह देखील प्रशासनाने राजकीय व्यक्ती आणि इतर लोकांसाठी बंद केले आहे.
मंगळवारी रात्री बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक (avinash pathak )रेस्ट हाऊस वर भेटीसाठी गेले. तेव्हा त्या ठिकाणी इलेक्शन ऑबझरव्हर साठी आरक्षित असलेल्या खोल्यांमध्ये इतर लोक थांबल्याचे दिसून आले.
रेस्ट हाऊस वाऱ्यावर सोडून शाखा अभियंता अक्षय भागवत आणि मॅनेजर अकबर पटेल दोघेही गायब असल्याचे पाठक यांना दिसून आले. त्यामुळे त्यांचा पारा चढला. न्यूज अँड व्यूज.त्यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना रेस्ट हाऊस वर बोलावून कान उघडणी केली.
संतापलेल्या जिल्हाधिकारी पाठक यांनी तातडीने संबंधित यंत्रनेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भागवत आणि पटेल या दोघांवर मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी न्यूज अँड व्यूज ला दिली.
बीडचे रेस्ट हाऊस म्हणजे राजकीय / दारुड्यांचा अड्डा
बीडचे रेस्ट हाऊस म्हणजे सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्यासाठी हक्काचे घर झालेले आहे. कोणीही यावे अन मुक्काम करून जावे अशी पद्धत येथे दिसून येते. बहुतांश वेळा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे दारू पार्टीसाठी रेस्ट हाऊस चा वापर करतात हे अनेकांनी पाहिले आहे. न्यूज अँड व्यूज.मात्र जर बांधकामं विभागाचे उपाभियंता हेच जर या कार्यकर्त्यांसोबत किंवा त्यांच्या समोर दारू पिऊन येथे येतं असतील तर कोणाला बोलणार अशी अवस्था आहे.
तोंडे म्हणजे मला पहा अन फुल वहा!
सार्वजनिक बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे म्हणजे मला पहा अन फुल वहा अशी अवस्था आहे. त्यांच्या कार्यालयातील शिपाई तरी त्यांचं ऐकतो कि नाही अशी शंका आहे. आलेल्या फाईलवर ठरलेल्या प्रोटोकॉल नुसार सह्या करायच्या अन शांत राहायचे असा त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांचे उप अभियंता चंद्रकांत बोराडे हे सगळं वन टू गोळा करतात, त्यातील साहेबांचा हिस्सा त्यांना देतात अन साहेब केवळ सह्याजी राव म्हणून कारभार पाहतात अशी चर्चा बांधकामं विभागात सुरु आहे.
Leave a Reply