News & View

ताज्या घडामोडी

images 41

बीडचा निर्णय वेटिंगवर!शिवसेनेची पहिली यादी जाहिर!

मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहिर केली आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत मराठवाड्यातील अनेक जागा जाहिर केल्या असल्या तरी बीड बाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही जागा सेना लढवणार कि अजित पवार हा सस्पेन्स कायम आहे.

भाजपने दोन दिवसापूर्वी आपली पहिली यादी जाहिर केली. त्यानंतर अजित पवार यांनी 17उमेदवारांना एबी फॉर्म दिले. परंतु शिवसेना ani इतर पक्षांचे उमेदवार ताटकळतं होते. अखेर शिवसेनेने आपली पहिली यादी जाहिर केली आहे.

1000735351
1000735350
1000735348

या यादीत मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील अनेक जागा जाहिर केल्या आहेत. मात्र बीड बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबई त तळ ठोकून आहेत. मात्र मुंडे बंधू भगिनीं यांनी बीडसाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याने सेनेने ही जागा अद्याप जाहिर केलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *