News & View

ताज्या घडामोडी

एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है -धनंजय मुंडे!

छत्रपती संभाजीनगर -दुवा करो के सलामत रहे मेरी हिम्मत, ये एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है असं म्हणत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र त्यांना माहित नाही मी धनंजय आहे, मला चक्रव्युव्ह भेदणं चांगल माहित आहे अशी गर्जना मुंडे यांनी केली.

संभाजीनगर जिल्ह्यात राहणाऱ्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थी आन नागरिकांशी मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, मी पाचव्या सहाव्या फळीतील कार्यकर्ता आहे, मात्र माझी एवढी धास्ती काही लोकांनी घेतली आहे कि ते मला पराभूत करण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेत.

स्व गोपीनाथ मुंडे याच्या खांद्याला खांदा लावून मी राजकारण आणि समाजकारण केलं आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहचावी यासाठी आपली धडपड सुरु आहे. माझ्यासारख्या माणसाचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी मोठं मोठे लोक व्युहरचना करत आहेत. पण तुमचा आशीर्वाद जोपर्यंत पाठीशी आहे तोपर्यंत मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.

दुवा करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, ए एक चिराग कई आंधीयों पे भारी है असा शेर सादर करत मुंडे यांनी येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही साथ द्या मी संकट काळात कायम तुमच्या पाठीशी उभा राहील असा शब्द दिला.

अभिमन्यू ला ज्याप्रमाणे व्युहरचना करून संपवलं तस मला संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत पण मी एवढ्या लवकर संपणार नाही. काही लोकांनी माझी जातं काढली, माझी लायकी काढली पण तुम्ही मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गुरुपुष्य मुहूर्त साधणार

विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून धनंजय मुंडे हे गुरुवारी 24ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज गुरुपुष्यामृत योगावर साध्या पद्धतीने भरणार आहेत. पंकजा मुंडे आणि महायुती मधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *