मुंबई -भाजपच्या आ पंकजा मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन चर्चा केली. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, गेवराई या मतदार संघात कोण उमेदवार द्यायचा याबाबत या तिघांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. तर दुसरीकडे सध्या पक्षांतर्गत बैठका सुरु आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील विधानसभा जागांवर चर्चा करण्यात आली.
भाजपचा बालेकिल्ला अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. पंकजा मुंडे आणि अजित पवार यांची काल रात्री उशिरा ११.३० च्या दरम्यान भेट झाली. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला धनजय मुंडे देखील उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे सध्या बीडमधील वातावरण काय, परळी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न काय याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबद्दलही चर्चा करण्यात आली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या वर्चस्वाला शह देऊन बीड जिल्ह्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, याबद्दलही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
Leave a Reply