नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे.
23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये असेल असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय.
मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममध्येही 2000 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेतही माहिती दिली होती.
रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात 2000 रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती दिली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापली गेली नाही. त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद झाल्या. या चलनांऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
Leave a Reply