मला पहा अन पैसे वहा, फुलारीचा नवा धंदा!
बीड – बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे पैसे द्या आणि काहीही करा असाच झाला आहे शिक्षणाधिकारी असलेले फुलारी अक्षम्य असे दुर्लक्ष असल्याने बट्ट्याबोळ झाला आहे शाळांच्या संच मान्यता कुठलीच कागदपत्रे शिक्षण विभागात उपलब्ध नसल्यामुळे सुरू आहे नूतन सीईओ शिक्षण विभागाच्या या गैरप्रकाराला आणि फुलारींवर कारवाई करणार का असा प्रश्न चर्चेला जाऊ लागला आहे.
बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे आंधळ जळते आणि कुत्र पीठ खातय अशीच अवस्था झालेली आहे. जिल्हा परिषदेत इनवर्ड झालेला कागद आणि याचा कोणाला ताळमेळ लागत नाही
शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते या खाजगी देण्यात येणारी परवानगी, यु-डायस नंबर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व कागदपत्रे, संच मान्यता देण्याचे काम शिक्षण विभागामार्फत होते
एवढा महत्त्वाचा विभाग असला तरी या ठिकाणी खुर्चीवर बसलेले फुलारी नावाचे शिक्षणाधिकारी यांचे केवळ लक्ष्मीदर्शनामध्ये लक्ष असल्यामुळे शिक्षण विभागाकडे सगळाच अवमेळ सुरू आहे शिक्षण विभागामध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसल्याने खाजगी संस्था चालक मात्र मजा करत आहेत
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असून त्याला शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी यांचाच आशीर्वाद आहे. 2012पासून शिक्षक भरती बंद असताना अनेक संस्थाचालक हे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून आपले काम करवून घेत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी कोणत्याच शाळेचे कसलेच रेकॉर्ड उपलब्ध नाहीये.
Leave a Reply