News & View

ताज्या घडामोडी

n50109921616844671299265ac82980e45472166ad9620547c7363545a004b14a85ee7793e23af8fb3d0cc7

अप्पा जाधवची हकालपट्टी ! धोंडू पाटलांचे पद काढले !!

बीड- शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या बीडच्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचे संपर्कप्रमुख पद काढून घेण्याची कारवाई पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी केली आहे बीडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटले जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे

शिवसेनेच्या वतीने राज्यभरात सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीड येथे शनिवारी वीस मे रोजी होतो आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी बीडमध्ये करण्यात आली आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आलेल्या शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यात आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात बाचाबाची झाली यावेळी संतापलेल्या जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्या कानाखाली दोन झापडी मारल्या

हा सगळा प्रकार झाल्यानंतर उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी आप्पा जाधव यांना बेदम मारहाण करत त्यांची गाडी फोडली या सगळ्या प्रकाराची स्वतः आप्पा जाधव यांनीच माहिती सोशल मीडियावर दिल्यानंतर पक्षाने तातडीने याची दखल घेत जाधव यांचे जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे तर संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांना देखील पदावरून दूर केले आहे

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या एक दिवस अगोदर शिवसेनेत हे सगळे कुठे घडल्यामुळे खळबळ उडाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *