News & View

ताज्या घडामोडी

विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचा दौरा करणार -पंकजा मुंडे!

सावरगाव -बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात जल्लोषात उपस्थितांशी संवाद साधला. समोर बसलेल्या लोकांवर माझे पोटच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम आहे, मी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, या मेळाव्याला राज्याच्या कानकोपऱ्यातून लोक आले आहेत. त्यांच्या सोबतीने आपण पुढील वाटचाल यशस्वी करू असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.

सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी खा सुजय विखे पाटील, महादेव जानकर, लक्ष्मण हाके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आपण विधानसभा निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा काढणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी पिवळे शर्टवाले महादेव जानकर आणि गोंडस लेकरू लक्ष्मण हाके असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या शब्दफेकीला उपस्थितीत सभेतूनही तितकाच जोरदार प्रतिसाद मिळाला

हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच आहे. फार गोड आहे. माझा मुलगा आर्यमन. तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितलं तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे, असं पंकजा मुंडे या म्हणाल्या. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. १२ कोटी या जनतेने भरले. माझा निकाल लागला. जीव दिला लेकरांनी. तुम्ही माझ्यावर जीव लावता की नाही, मुलीसारखं प्रेम करता की नाही. आता मला काही नाही पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

मला मुंडे साहेबांनीव वारसा दिला. त्यांना त्यांचा मृत्यू दिसत आहे असं वाटतं. गोपीनाथ मुंडे शेवटचं वाक्य या गडावरून बोलले, मला गडावरून दिल्ली मुंबई नाही, पंकजा मुंडे दिसत आहे त्यांनी जो संदेश दिला तो मी खरा केला. मला काही करता आलं नसेल. पण मी भगवान भक्तीगड निर्माण केला. ज्या मातीत भगवान बाबांचा जन्म झाला, तिथे मी आले. लोक म्हणाले, ताई इथे घ्या मेळावा. मला काही लोक फोन करत होते, तुमच्या मेळाव्याला अमूक तमूक लोक येत आहे. म्हणाले, तुम्हाला इथून काढतील. मी म्हटलं आम्हाला काय, भगवान बाबांचा झेंडा घेऊन मी शेतात उभी राहिल, असे त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *