बीड- खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना बीडमध्ये घडली.उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाली.वरेकर यांनी यावेळी जाधव यांची गाडी फोडली.हा सगळा प्रकार घडला त्यावेळी उपनेत्या अंधारे या देखील समोर होत्या हे विशेष.
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये 20 मे रोजी होणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी बीडमध्ये सुरू आहे.कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल जगताप,संपर्कप्रमुख धोंडू पाटील,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,उपनेत्या सुषमा अंधारे गुरुवारी सायंकाळी पोहचले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात धक्काबुक्की झाली.त्यानंतर हे प्रकरण मारामारी पर्यंत गेले.यावेळी उपस्थितांनी सोडवासोडवी केली.परंतु संतापलेल्या वरेकर यांनी जाधव यांची गाडी फोडली.यामुळे काहीकाळ कार्यक्रम स्थळी तणाव निर्माण झाला होता.
Leave a Reply Cancel reply