News & View

ताज्या घडामोडी

भाजपने हरियाणा राखले तर काश्मीर काँग्रेस कडे!

नवी दिल्ली -सगळ्यांचे लक्ष लागलेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत सगळे सर्व्हे मागे सोडत भाजपने आघाडी घेतली आहे. हरियाणा मध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे मात्र जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मतदानोत्तर चाचणी मध्ये हरियाणा आणि काश्मीर दोन्ही राज्ये भाजपकडून जाणार असे सांगितले गेले होते. मात्र मतमोजणी नंतर चित्र उलटे झाले आहे.

हरियाणात काँग्रेसची घसरगुंडी झाली असून त्यांचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. दुपारी एक वाजेपर्यंच्या कलानुसार, भाजप सध्या ५२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त ३३ जागांवरच पुढे आहे. हरियाणामध्ये वारे उलटे फिरल्याचे चित्र तयार झालं आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून काँग्रेसच्या गोटात निराशा पसरली आहे.

विशेष बाब म्हणजे मतमोजणीच्या सुरुवातीला सकाळी १० वाजेच्या सुमारास हरियाणात काँग्रेसने तब्बल ६५ जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजप फक्त १९ जागांवर आघाडीवर होते. मात्र, अर्ध्या तासांतच चित्र बदललं. सुरुवातीच्या पि‍छेहाटीनंतर हरियाणात भाजपने जोरदार मुसंडी मारत अर्धशतक पार केलं. दुसरीकडे काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर पडले.

उचाना कलां मतदारसंघातून दुष्यंत चोटाला चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तर अंबाला कँटमधूनही काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट पिछाडीवर पडल्या आहेत. दुसरीकडे भाजपकडे मोठी आघाडी आहे. त्यामुळे भाजप हरियाणात विजयाची हँक्ट्रिक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, भाजपने अचानक मुसंडी मारल्यानंतर हरियाणातील बदली येथेली भाजपचे उमेदवार ओम प्रकाश धनखड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, “आम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत. दुपारपर्यंत आम्हीच सरकार स्थापन करत असल्याचे चित्र स्पष्ट होईल. सगळेच दावे करत आहेत पण कोणाचे दावे खरे आहेत हे निकालातून कळेल”. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये पावणे अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने तब्बल ४८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपा २८ तर पीडीपीने १४ जागांवर आघाडी मिळवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *