News & View

ताज्या घडामोडी

घटस्थापना विधी आणि नऊ दिवसांची पूजा!

बीड -शारदीय नवरात्र अर्थात घटस्थापना गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी होतं आहे. घटस्थापना करताना नेमका काय विधी करावा लागतो, कलश पूजन, घट मांडणी व इतर गोष्टी बाबत सविस्तर जाणून घेऊया.

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केली जाते. या वर्षी ३ ऑक्टोंबरला सकाळी ६ वाजून ७ मिनीटपासून सकाळी ९ वाजून ३० मिनिटीपर्यंत स्थापनेचा मूहुर्त आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजून ३७ मिनिटपासून १२ वाजून २३ मिनिंटापर्यंत अभिजीत मुहूर्तापर्यंत कलश स्थापित करू शकतो.

हिंदू धर्मात सर्व मंगल कार्यात कलश स्थापित करतात. कलशाला सुख-समृध्दि व ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीत कलश स्थापनेसाठी कलशात पाणी, विड्याचे पान, तांदूळ, कुंकू, आंब्याचे पान, मौली, अष्टगंध, दुर्वा, सुपारी,फूल, सूत,श्रीफळ, धान्य, लाल कापड,ज्वारी, १,२ रूपयांचे सिक्के आदी सामग्रीचा उपयोग केला जातो.

सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
9. दिवा लावा आणि त्याची पूजा करा.
10. पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ अर्पण करतात.

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.

पहिली माळ
विडाच्या पानाची माळ असते.

दुसरी माळ
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.

तिसरी माळ
निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलांच्या माळ.

चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात.

सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ
तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ
कुंकुमार्चन करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *