जालना -मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या आठवण दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.सायंकाळी पाच वाजता ते उपोषण स्थगित करून रुग्णालयात दाखल होतील. आपल्याला कोणी भेटायला येऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी समाजाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि,आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा. कोणत्याही विषयावर वाद घालू नका. आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे. मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो. त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परिक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठ दु:ख होतं. त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई-बापांना मोठा पश्चाताप अशावेळी होतो असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत.
फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही जायचं नाही. त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या. उगीच आपलं नुकसान करु नका. मात्र, तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोप नाही असा इशारचं एका प्रकारे जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे. आपण त्याचा अंत पाहू नये असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी केला होता आरोप
जाती जातींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो आहे. आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो आहोत. मात्र जे आमच्याशी भांडत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर कुणी येऊ नका. आम्ही आत्ताही तु्म्हाला मानतो आहे आयुष्यभर मानत आहेत. देवेंद्र फडणवीस तुमची काही जहागिरी नाही. तुमचा समाज तुम्हाला मोठं करणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी सगळी षडयंत्रं रचली असा थेट आरोपच काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी केला होता.
Leave a Reply