ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटींची संपत्ती जप्त
बीड,छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबई येथील मालमता जप्त
बीड – ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आलीये.जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टिस्टेटने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्याप वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत.
ईडीकडून कारवाई करत ज्ञानराधा मल्टिस्टेटची मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व बीड येथील जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ईडीकडून आतापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीये.यामधे
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर व बीड येथील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालये, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता अशी एकूण 95 कोटी 1 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.ईडीने ज्ञानराधा मल्टिस्टेटचे संस्थापक सुरेश कुटे व इतरांविरुद्ध मनी लॉड्रिगच्या प्रकरणात ही कारवाई केली. यादी दिल्ली अहमदाबाद जळगाव येथील मालमत्ता ही जप्त करण्यात आली य
Leave a Reply