News & View

ताज्या घडामोडी

बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!

बीड -परिवहन विभागाची बस आणि मोसम्बी घेऊन जाणारा ट्रक यांच्या भीषण अपघातात बसचालक, वाहक यांच्यासह सहा जण ठार झाले. एसटी बँक चे संचालक बंडू बारगजे यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा एक नेता म्हणून बारगजे यांची ओळख होती. या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाले आहेत.

जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये 6 जण ठार झाले असून 18 जण जखमी झालेत जखमी पैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान अंबाजोगाई महामंडळाची बस होती ती जालन्याला जात होती.अंबडपासून 10 किमीवर झालेल्या या अपघातामुळे जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जालना बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक त्यांच्या मदतीला धावले.घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. नक्की अपघात कसा झाला ही माहिती अजून ही पुढे आली नाही.

एसटी कर्मचारी बँकेचे संचालक आणि कामगार चळवळीत अग्रभागी असणारं व्यक्तिमत्व म्हणून बंडू बारागजे यांचा परिचय होता. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारा वाघ अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या मृत्यूमुळे कर्मचारी वर्गात देखील शोककळा पसरली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बस ला जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक बसली , प्रत्यक्षदर्शी च्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण 24 प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *