माजलगाव – ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या कारणावरून माजलगाव येथील एका व्यापाऱ्याला दुकानात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून दुकानात घुसून एकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या माजलगाव शहरात उघडकीस आला आहे. मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तीन ते चार पुरूष आणि एका महिलेने दुकानात शिरून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. अशोक बाळासाहेब सोळंके असं मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते या घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एक महिला आणि तीन ते चार पुरूष यांनी दुकानात घुसून अशोक सोळंके यांना बेदम मारहाण केली, दुकानात शिरल्यानंतर त्यांनी दुकान लावून घेतलं आणि नंतर सोळंके यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत सोळंके हे जखमी झाले आहेत, दरम्यान याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply