बीड -मागील विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात अमरसिंह पंडित यांच्या सांगण्यावरून ज्यांना उमेदवारी दिली अन विजयी केल ते आज सोडून गेले, पण यापुढे जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदार हे महायुतीचे निवडून येतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असतील असं सांगत राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे स्वागत केले.
बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत जे झालं त्याची पुनरावृत्ती ना होऊ देता आम्ही सहा आमदार महायुतीचे विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न करू असे म्हटले.
भैय्यासाहेब तुमच्यासाठी वेगळी तरतूद करू -मुंडे
बीड जिल्ह्यात चार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि दोन महायुतीचे आमदार विजयी होतील असं सांगताना ना. मुंडे यांनी व्यासपीठावर असलेल्या माजी आ अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहून भैय्यासाहेब तुमच्यासाठी वेगळी तरतूद असेल असे म्हटले. अमरसिंह पंडित यांच्या गेवराई मतदान संघात भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस ला संधी मिळणार का अशी चर्चा यामुळे सुरु झाली आहे.
Leave a Reply