बीड -बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर अविनाश पाठक यांनी जनतेच्या सोयीसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या नंबर वर जनतेने आपल्या तक्रारी पीडीएफ स्वरूपात पाठवाव्यात, ज्यामुळे तातडीने निर्णय घेण्यास सोईचे होईल असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अविनाश पाठक यांचा बीड येथील अनुभव दांडगा आहे, उपजिल्हाधिकारी ते जिल्हा परिषदेचे सिइओ आणि आता जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले आहेत. बीड जिल्ह्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पाठक यांचा चांगला अभ्यास आहे.
पाठक यांनी पदभार घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसून ते तक्रारीचा निपटारा करतात हा आजपर्यंत चा अनुभव आहे. दरम्यान पाठक यांनी 8788998499 हा मोबाईल नंबर हेल्पलाईन साठी जारी केला आहे. या नंबरवर नागरिकांनी तक्रारी कराव्यात, त्यासोबत कागदपत्रे पीडीएफ फाईल मध्ये जोडावीत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Leave a Reply