News & View

ताज्या घडामोडी

बोगस कागदपत्रावर दिली पदोन्नती!सिइओ पाटील मॅडम यांचा आंधळा कारभार!!


बीड – जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या दोन सिइओ नि नाकरलेले प्रमोशन प्रभारी सिइओ संगीतादेवी पाटील यांनी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना आशीर्वाद दिला आहे. यामध्ये त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, बांधकामं चे प्रभारी कार्यकारी अभियंता राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

बीड जिल्हा परिषदेत गेल्या दोन अडीच वर्षांपासून अधिकारी राज सुरु आहे.या अधिकाऱ्यांनी मनमानी करत पुढऱ्यांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवत स्वतःचे घर भरण्याचे काम सुरु केले आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती चा विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होता. तत्कालीन सिइओ अजित पवार आणि नंतर आलेले अविनाश पाठक यांनी या पदोन्नती ला नकार दिला होता.

कैलास सानप नावाच्या एका कर्मचाऱ्याने बाहेरच्या राज्यातील डिप्लोमा केल्याचे कागदपत्र सादर केले होते. ज्याची तपासणी जिल्हा परिषदेने केली असता ही कागदपत्र बोगस आढळून आली. मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी सानप याच्या पदोन्नती चा हवाला घेतला असल्याने त्यांनी पुन्हा एकदा तपासणी करण्यास सांगितले.

दुसऱ्यांदा हे कागदपत्र मॅनेज करण्यात आली. त्यानंतर पाठक हे मसूरी येथे प्रशिक्षणाला गेले असता ही फाईल काकडे यांनी पुन्हा मुव्ह केली. परंतु पाठक यांनी त्यावर स्वक्षरी करण्यास पुन्हा नकार दिला.

दरम्यान त्यांची बदली झाल्यानंतर प्रभारी सिइओ संगीता देवी पाटील यांनी हे प्रकरण हातात घेतले. सोमवारी सानप यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश काढण्यात आले.

एखाद्या कर्मचाऱ्याने बाहेरच्या राज्यातून डिप्लोमा किंवा शिक्षण घेतले असल्यास त्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. त्यात बोगस पणा आढळून आल्यास पदोन्नती नकरण्यात येते, परंतु पैशाच्या जीवावर बीड जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांनी अक्षरशः नंगानाचं सुरु केला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *