बीड – नगर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असला तरी पाटोदा नगर पंचायत मध्ये नोकरीस असलेला ट्रेसर सलीम याने सिओ अंधारे बाई ना हाताशी धरून आउट वर्ड रजिस्टर घरी नेवून ठेवत शेवटचा हात मारण्याची तयारी केली आहे.
बीड नगर पालिकेत सुषमा अंधारे नावाच्या सिओ मॅडम ने गैर कारभाराचा कळस गाठला आहे. नाट्यगृहाची दुरुस्ती असो कि पाणी पुरवठा, स्वछता विभागात कागदावर दाखवले गेलेले काम, अंधारे यांनी बोगस कामाच्या माध्यमातून आपल्या भावाला गुत्तेदारीत सेट केले आहे.
त्यांच्या या बोगस कारभारात त्यांना सर्वार्थाने मदत करण्यासाठी डिके उर्फ सलीम ट्रेसर हा कायम सोबत आहे. सलीम ची मूळ पोस्टिंग पाटोदा नगर पंचायत येथे असली तरी तोच बीड नगर पालिकेचा देखील कारभार हाकत आहे.
बांधकामं परवानगी असो कि गुंठेवारी अथवा बोगस एन ए ले आउट सगळे प्रकार सलीम बिनधास्त पणे करत आहे, कारण खंबीर साथ आहे ती अंधारे मॅडम ची.
रिटायर होण्यासाठी पंधरा दिवस असल्याने सलीम ने नगर पालिकेतील आउटवर्ड रजिस्टर घरी नेवून ठेवले आहे. तसेच या विभागातील कर्मचाऱ्यांना बक्कळ पैसे खाऊ घालून हा रजिस्टर मध्ये रिकाम्या जागा सोडून मागील तारखेत परवानगी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे..
जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांनी सलीम ट्रेसर आणि अंधारे बाई ने जो गोंधळ घातला आहे त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. नगर रचना विभाग, बांधकामं परवानगी अन ले आउट मंजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यास दूध का दूध अन पाणी का पाणी होईल.
Leave a Reply