बीड – बीड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक असणाऱ्या डॉ बडे यांचे एक एक किस्से बाहेर येत आहेत. या बडे महाशयानी स्वतःच्या घरी तांब्या पितळेची भांडी खरेदी केली अन बिल मात्र फिनेल आणि नॉन मेडिकल चे घेऊन अदा करण्यात आले आहेत.
सीएस अशोक बडे यांच्या कारभाराबाबत बीडचे खा बजरंग सोनवणे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर बडे गैरहजर होते, विना परवानगी गैरहजर राहणे, शुक्रवार ते सोमवार लातूर ला मुक्कामी राहणे, मात्र कार्यालयात शासकीय दौरा दाखवणे असले उद्योग तर बडे यांच्याकडून वारंवार केले जातं आहेत.
दरम्यान या बडे यांच्याबाबत नवीनच किस्सा ऐकायला मिळाला आहे. यांच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले कि, यांच्या घरी शासकीय खर्चातून तांब्या पितळेची भांडी, मुलींसाठी बाथ टब, लॅपटॉप, महागडे मोबाईल पोहच होतात. बिल मात्र जिल्हा रुग्णालयाच्या स्टोर मधून मेडिकल अन नॉनमेडिकल खरेदी दाखवून अदा केले जाते. या बाबत आरोग्य उपसंचालक लातूर यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली असून बडे हे घरचा किराणा सुद्धा शासकीय खरेदीच्या बिलातूनच भरतात कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Leave a Reply