बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला वैतागून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे. या जेजुरकर महाशयानी आपल्याच कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांना चावट मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार होऊन महिना लोटला तरी अद्याप जेजुरकर यांच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष.
राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात काम करणाऱ्या जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कारभारावर शेतकरी तर नाराज आहेतच पण कार्यालयीन कर्मचारी देखील नाराज आहेत.
जेजुरकर हे सोबतच्या कर्मचाऱ्यांना अपमानस्पद वागणूक देतात, विभागा बाहेरील कामे सांगतात. जे सेक्शन नाही ती कामे करायला सांगतात. ना केल्यास अपमान करतात. अशा तक्रारी अनेकांनी केल्या. मात्र त्यांच्यावर कसलीच कारवाई झाली नाही.
महिनाभरपूर्वी कार्यालयातील दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांनी याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देऊन सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान या जेजुरकर यांचे अनेक रंगीन किस्से समोर येत आहेत. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना लज्जा वाटेल असे अश्लील मेसेज या महाशयानी पाठवले. याबाबत देखील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही.
Leave a Reply