बीड -जिल्हा परिषदेच्या कारभारात बोगस कागदपत्र सादर करून नोकरीं मिळवणे किंवा प्रमोशन मिळवण्याचे उद्योग पुन्हा डोके वर काढू लागले आहेत, याकडे प्रभारी सिइओ संगीता देवी पाटील यांनी लक्ष देऊन संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुभाष सोनवणे नावाचा एक व्यक्ती तत्कालीन डि एच ओ डॉ अमोल गित्ते यांच्या आशीर्वादाने नोकरीस लागला, हा व्यक्ती कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र त्याने सादर केले. मात्र नोकरीला लागल्यानंतर सहा महिन्यात त्याचे मेडिकल बोर्डाकडून मेडिकल करून घेणे बंधनकारक असताना अद्याप दोन अडीच वर्ष झाले तरी त्याचे मेडिकल झालेले नाही.
त्याला आरोग्य विभागातील काही कर्मचारी पाठीशी घालत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बोगस कागदपत्र सादर करून काही व्यक्ती प्रमोशन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तत्कालीन सिइओ अविनाश पाठक यांनी हे प्रमोशन नाकारले होते, मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी पाठक जाताच पुन्हा ही फाईल प्रभारी सिइओ पाटील मॅडम यांच्याकडे पाठवली आहे. असेच काही प्रकार शिक्षण विभागात देखील सुरु आहेत. अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी असे अनेकजण बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरीस लागले आहेत, किंवा लाभ घेत आहेत, त्यांच्यावर देखील काकडे यांची कृपादृष्टी असल्याने सिइओ पाटील काहीच कारवाई करत नाहीत अशी चर्चा आहे.
संगीता देवी पाटील यांना प्रभारी पदभार भेटला असला तरी बीड जिल्ह्यात नाव करण्याची मोठी संधी मिळालेली आहे, त्या मात्र काकडे यांच्या प्रभावाखाली चुकीचे निर्णय घेत असल्याची चर्चा आहे. पाठक यांनी ज्या पद्धतीने चुकीला माफी नाही हा नियम पाळला होता तसाच कारभार पाटील यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातं आहे.
Leave a Reply