बीड -ज्या विभागातून तक्रारी आल्याने निलंबित करण्यात आले त्याच विभागात पुन्हा वादग्रस्त कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्याचा प्रताप बीड जिल्हा परिषदेत घडला आहे. हा कर्मचारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मर्जीतील असल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टचाराचा अड्डा झालेला आहे. या कार्यालयात दाम दिल्याशिवाय काम होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत. बीडचे माजी सिइओ आणि विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शिक्षण विभागातील वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई केली होती.
यामध्ये बिजलवाड, आखाडे आणि अन्य एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. दरम्यान पाठक यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होताच जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भ्रष्टाचार बोकाळला आहे. जिल्हा परिषदेत निलंबित झालेले कर्मचारी एस सी आखाडे यांना तालुका बदलून दुसरे मुख्यालय देण्याऐवजी बीडलाच सामान्य प्रशासन विभागात नियुक्ती देण्यात आली. एवढ्यावरच ना थांबता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी या आखाडे महाशय यांना पुन्हा शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती देताना ज्या टेबलमुळे आखाडे निलंबित झाले तोच टेबल म्हणजे प्राथमिक विभाग एक मध्ये नियुक्ती दिली आहे.
विशेष बाब म्हणजे प्रभारी सिइओ संगीता देवी पाटील यांची कसलीच मान्यता ना घेता हा सगळा प्रकार करण्यात आला आहे. पाटील यांना माहित ना होऊ देता किंवा त्यांना खोटे सांगून, त्यांची दिशाभूल करून अनेक गैरप्रकार जिल्हा परिषदेत सुरु आहेत, याकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
Leave a Reply