News & View

ताज्या घडामोडी

सलीम ट्रेसरने हिंदू स्मशानभूमीची जागा विकली!

बीड -नगर पालिकेत ट्रेसर असणाऱ्या परंतु सगळं कारभार एकहाती चालविणाऱ्या सलीम उर्फ डि के या व्यक्तीने हिंदू स्मशानभूमीची जागा मुस्लिमांच्या घशात घालण्याचा उद्योग केला आहे. यामध्ये तत्कालीन सिइओ उत्कर्ष गुट्टे यांचाही मोठा वाटा आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष.

शहरातील हिंदु स्मशानभ्ूमीच्या पूर्वेकडील जागेची चतु;सिमा बदलून तत्कािलन सीओ उत्कर्ष गुट्टे आिण ट्रेसर सय्यद सलीम यांनी खोटे दस्तावेज तयार केले. या दस्तावेजाच्या आधारे िहंदुंची स्मशनभूमीची जागा हडपण्याचा या दोघांचा प्रयत्न होता. मात्र या प्रकरणी शिवसेना िजल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 जून रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सीओ गुट्टे आिण ट्रेसर सलीम यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना िदले आहे.

सीओ उत्कर्ष गुट्टे आिण ट्रेसर सय्यद सलीम यांनी संगणमताने बनावट दस्तावेज तयार करुन बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी हडपण्याचे प्रकार केले आहे. नालायकपणाचा कळस म्हणजे या दोघांना िहंदू स्मशानभूमीची जागाही पुरली नाही. गुट्टे, सलीम यांनी  शहरातील सर्व्हे नंबर 28 मधील  भगवानबाबा मंदिरा शेजारी असलेल्या हिंदू स्मशानभ्ूमीच्या पूर्वेकडील (खासबाग देवी ते स्मशानभूमी ते बार्शी रोडकडे जाणारा रस्ता) या जागेची चतु;सिमा  चुकीच्या पध्दतीने बदलून बनावट दस्तावेज तयार केले आणि सदरील जमीन हडपण्याचा या दोघांना कुटील डाव होता.  एवढेच नव्हे तर या जागेवर काही लोकांना अितक्रमण करायला लागवून जाणून बुजून हिंदु मुस्लीम समाजात तेढ िनर्माण करण्याचा प्रयत्न गुट्टे, सलीम यांनी िमळून केला आहे.  सदरील बाब शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हिंदु स्मशानभ्ूमीची जमिन हडपून दोन समाजात तेढ निर्माण करणारे तत्कािलन सीओ गुट्टे व ट्रेसर सय्यद सलीम यांच्यावर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना निलंबित करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी  सदरील प्रकरणाची कायदेशीर कार्यवाही करुन गुट्टे, सलमी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यानंतर सर्व प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करावा अशी असेही आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *