News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1721809549416

पूर्णवादी च्या अध्यक्ष्यपदी डॉ सुभाष जोशी!

बीड – राज्यात नावलौकिक असलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बीड येथील प्रतीथयश बालरोग तज्ज्ञ डॉ सुभाष जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या पूर्णवादी बँकेचे चेअरमन डॉ अरुण निरंतर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली, यामध्ये सर्वानुमते डॉ सुभाष जोशी यांची निवड करण्यात आली.

राज्यभरात शाखांचे जाळे, शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या बँकेची धुरा एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *