News & View

ताज्या घडामोडी

कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!

बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला कंटाळून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे, जे सेक्शन दिले आहे त्या व्यतिरिक्त इतर कामे सांगणे, कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा नामंजूर करणे, कर्मचाऱ्यांना अर्वांच्च भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध होत्या.

कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा सांगूनही जेजुरकर यांच्या वागण्यात बदल होत नसल्याने अखेर सर्वच कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *