News & View

ताज्या घडामोडी

पूजा खेडकर वर मोठी कारवाई!

मुंबई -वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्यात आला आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.

23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे.

पूजा खेडकरांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. तसेच त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं. आता या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने आपला तपास सुरू केला असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल मंत्रालयाला देण्यात येणार आहे.

आपल्या चमकोगिरीमुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकरांच्याबद्दल रोज नवनव्या बातम्या समोर येत आहेत. प्रशिक्षणार्थी असतानाही स्वतःला स्वतंत्र केबिन आणि सरकारी गाडीची मागणी पूजा खेडकरांनी केली होती. त्यानंतर त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची केबिन बळकावून त्या ठिकाणी स्वतःचे फर्निचर ठेवले. तसेच स्वतःच्या खासगी ऑडीवर अंबर दिवा लावला. यामुळे पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *