लक्ष्मीकांत रुईकर!
एकाचवेळी स्वपाक्षातील नेत्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यासोबत सुद्धा सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे अन सत्ता असो कि नसो जनसेवेत गुरफटून राहायचे हे कसब राजकारणात फार थोड्या लोकांना जमते, पण ज्याला जमते तो जननेता किंवा मास लीडर झाल्याशिवाय राहत नाही हे ही तेवढेच खरे आहे. असाच एक मास लीडर अर्थात ओबीसी नेता म्हणजे धनंजय पंडितरावं मुंडे होय. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
धनंजय मुंडे म्हणजे जीवाला जीव देणारा मित्र आणि कार्यकर्त्यांसाठी अर्ध्यारात्री धावून जाणारा नेता. जिल्ह्यातील कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने हक्काने आपलं काम सांगावं अन ते शंभर टक्के होणार ही खात्री देणारा राजकारणी म्हणजे धनंजय मुंडे.गेल्या तीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात या माणसाने कधी कोणाची जातं धर्म पाहून मदतीचा हात पुढे केल्याचं आठवत नाही. मात्र दुर्दैवाने त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जातीची आठवण करून देण्यात आली. सर्वसामान्य रिक्षावाल्यापासून ते आलिशान कार वाल्यापर्यंत प्रत्येकाला हवाहवासा वाटाणाऱ्या या नेत्याच्या पदरात संघर्ष कायम राहिला. मात्र संकटावर मात करण्याचं बाळकडू आपल्या काकाकडून घेतेलेल्या धनंजय यांनी याच बळावर आज राजकारणात आपलं एक अढळ स्थान निर्माण केल आहे.
धनंजय मुंडे यांची लायकी जेव्हा शरद पवार यांनी काढली त्याच दिवशी हा माणूस राजकारणात खूप मोठा झाल्याची जाणीव तमाम बिडवासियांना झाली. मंत्रिपद कोणतंही असो त्याच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचा हे धोरण त्यांनी स्वीकारलेले. अन त्यामुळेच सामाजिक न्याय विभागाला देखील त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.स्व. गोपीनाथ मुंडे यांची सावली म्हणून ज्यांची ओळख राज्यभर होती त्या धनंजय मुंडे यांच्यावर नियतीने अशी वेळ आणली कि ते मुंडे यांच्यासह समाजाच्या नजरेत व्हीलन ठरले.
मात्र 2012 ते 2024 या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. स्व. मुंडे यांच्या निधनानंतर धनंजय यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश, 2014 ला पंकजा मुंडे यांच्याशी विरोधात लढवलेली परळी विधानसभा निवडणूक आणि त्यावेळी अपयश आल्यानंतरही 2019 मध्ये खेचून आणलेला विजयश्री.धनंजय मुंडे यांचा हा सगळं प्रवास थक्क करणारा आहे. मात्र 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचे बंड झाले अन त्यानंतर अजित पवार यांनी काकाची साठी सोडली. तत्पूर्वी 2019 चा पहाटेचा शपथविधी झाला, या सगळ्यात राजकारणाच्या आखड्यात केंद्रस्थानी होते ते धनंजय मुंडे. मुंडे आणि फडणवीस यांचे संबंध राज्याला माहित आहेत, त्यामुळे 2019 ला अजित पवार यांना फडणवीस यांच्यासोबत घेऊन जाण्यामध्ये मुंडे यांचा मोठा वाटा होता हे लपून राहिलेले नाही.त्यामुळेच ते अजित पवार यांच्याशी गळ्यातील ताईत असले तरी फडणवीस यांच्या गुडबुक मधील म्हणून ओळखले जातात. फडणवीस – पवार यांच्या मैत्रीतील सेतू म्हणून देखील धनंजय मुंडे यांची ओळख आहे. दोघेही राजकीय दृष्ट्या अडचणीत आले तर पॉवर बँक म्हणून धनंजय यांचा त्यांना आधार मिळतो हे नक्की.
मागील दोन तीन वर्षात धनंजय आणि पंकजा मुंडे या बहीण भावातील राजकीय वैर हळूहळू कमी झालं अन महायुतीत पवार सहभागी झाल्यानंतर दुराव्याच्या या भिंती गळून पडल्या.विरोधीपक्ष नेता असताना विकसकामे करण्यासाठी कदाचित धनंजय यांना मर्यादा असतील मात्र पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही कसर भरून काढली. गेल्या साडेचार पाच वर्षात त्यांनी जातं धर्म पक्ष या पलीकडे जाऊन विकास कामासाठी मदतच केलीय.
आज हा नेता पन्नाशीत प्रवेश करतो आहे. इथून पुढ वाटचाल करताना अधिक जबाबदारीने कर्तव्य पार पाडावी लागणार आहेत. राजकारणातील प्रतिमा, समजातील स्थान आणि दिलेला शब्द पूर्णपणे पाळण्याचा आटोकाट प्रयन्त करण्यासाठी या नेत्याला माहूर निवासिनी अंबाबाई प्रचंड आशीर्वाद देवो हीच सदिच्छा, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Leave a Reply