News & View

ताज्या घडामोडी

ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!

परळी वैद्यनाथ – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे.

सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके फंक्शन हॉल येथे उपस्थित राहून सहकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना भेटून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत तसेच ते सर्वांशी संवादही साधणार आहेत. धनंजय मुंडे यांचे राजकीय वलय मोठे असून संबंध महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे या दृष्टीने परळी, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाचे या निमित्ताने आयोजन केले आहे.

दरम्यान ग्रीन परळी व क्लीन परळी असा निर्धार व्यक्त करणारी विशेष महा मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा परळी शहर पोलीस ठाण्यात समोरच्या संत सेवालाल महाराज येथे सकाळी सात वाजल्यापासून शालेय गट, खुला गट व ज्येष्ठ नागरिक गट अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये होणार आहे. परळी वैजनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने दिनांक 15 जुलै ते 26 जुलै या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार असून प्रत्येक वार्डामध्ये महिलांना आपल्या कागदपत्रांसह या योजनेसाठी नोंदणी करण्याची सोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या आयुरारोग्यासाठी 12 ज्योतिर्लीगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांची महाआरती, उमर शहावली दर्ग्याला चादर, दाऊद शहा बाबांना चादर, नवमतदार नोंदणी अभियान यासह सबंध बीड जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना मदत यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *