News & View

ताज्या घडामोडी

विधानसभेला पुरे पाडा -जरांगेचा आदेश!

बीड – आमची मत पाहिजेत मात्र आम्ही हक्कासाठी लढत असताना आमच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करता, त्यांना मारहाण करता हे चालणार नाही, लोकसभेत मी फक्त ज्याला पाडायचं त्याला पाडा म्हणलो तर तुमची दाणादान उडाली, आता विधानसभा निवडणुकीत बीडमधील सगळे पाडा असा आदेश मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी दिला.

बीड येथे आयोजित भव्य शांतता रॅली आणि सभेला मनोज जरांगे यांनी संबोधित केले, लाखोंच्या संख्येने महिला, पुरुष, लहान मुले या रॅलीत सहभागी झाले होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेली अतिविराट रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पुतळ्याजवळ आल्यानंतर या ठिकाणी सभेला पाटील यांनी संबोधित केले.

मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या शांतता रॅलींनी संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज बीड इथे झालेल्या शांतता रॅलीत तुफान गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही भित नाहीत,आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहनच त्यांनी उपस्थित मराठा समाजाला केले. 


मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आणि कुणबी हा एकच असल्याचा उल्लेख केला. हैदराबादला त्याच्या नोंदी सापडल्या आहे. सगेसोयरे आणि सरसकट आरक्षण द्या ही आपली मागणी कायम आहे असेही ते यावेळी म्हणाले. मराठा समाजाचे दुख: ना महायुतीला दिसत आहे ना महाविकास आघाडीला. तु मारल्या सारखं कर आणि मी रडल्या सारखं करतो असं सध्या सुरू आहे असेही ते म्हणाले. आतापर्यंत आरक्षणासाठी 350 आत्महत्या झाल्या आहेत. असेही जरांगे यावेळी म्हणाले.
गेली 70 वर्षे पुढाऱ्यांना आम्हीच मोठं केलं. त्यांची मुलंबाळ आमदार मंत्री झाले. पण मराठा समाज तिकडेच आहे. त्याला आता हक्काचे आरक्षण हवे आहे. त्यांना अधिकारी व्हायचे आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घेतला पाहीजे. सरकारला मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर तसे झाले नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेने यावे लागले असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. जाती पेक्षा आपल्याला समोर कोणी मोठा नाही. फडणवीस हे भुजबळांना हाताशी धरून काम करत आहेत. त्यामुळे भाजप संपत चालली आहे. त्यामुळे मराठा समाजाने एकसंधा राहीलं पाहीजे. मतदान मोठ्या प्रमाणात करा असे जरांगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *