News & View

ताज्या घडामोडी

कर्नाटकात भाजपला धक्का बसणार !

नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.एक्झिट पोल नुसार काँग्रेस सर्वाधिक जागा घेऊन सत्ता स्थापनेच्या समीप पोहचेल अस दिसतंय.देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष पुन्हा एकदा किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकमध्ये आज मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे.

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार, भाजप 114 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवू शकते. तर, काँग्रेसला 86 आणि जेडीएसला 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा होऊ शकते. येथे भाजपला 85-100 जागा मिळतील, तर काँग्रेसला 94-108 जागा मिळतील. जेडीएसला 24-32 जागा मिळू शकतात आणि इतरांना 2-6 जागा मिळू शकतात.

सुवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार, भाजपला 94-117 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 91-106 जागा मिळू शकतात. जेडीएसला 14-24 जागा मिळतील आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोलनुसार, भाजपला 88-98 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 99-109 जागा मिळू शकतात. बहुमतापेक्षा हा आकडा कमी आहे. या एक्झिट पोलमध्ये जेडीएसला 21-26 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर इतरांना 0-4 जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 78.-92 जागा, काँग्रेसला 106-120 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जेडीएसला 20-26 आणि इतर पक्षांना 2-4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

झी न्यूज मॅट्रिज एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप 79-94 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेस 103-118 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनू शकतो किंवा बहुमत मिळवू शकतो. जेडीएसला 25-33 जागा मिळू शकतात आणि इतर आणि अपक्ष 2-5 जागा जिंकू शकतात.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 62 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 122 ते 140 जागांवर विजय मिळू शकतो. जेडीएसला 20 ते 25 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *