नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी लागेल अशी माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष गुरुवारी नेमका काय निकाल येतो याकडे लागले आहे
जून 2022 मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध बंड करत तब्बल 40 आमदारांना सोबत घेत सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं तेथून हे आमदार गोव्याला आले आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकत शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेल्या दहा महिन्यात अनेक वेळा या याची कव्हर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला मे महिन्यामध्ये या खटल्याचा निकाल लागेल असं स्वतः न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जाहीर केलं होतं मात्र हा निकाल कधी लागणार हे निश्चित नव्हतं दरम्यान बुधवारी न्यायमूर्ती चंद्रचूर यांनी स्वतः गुरुवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले आहे
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहित सोहळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार की हा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला जाणार याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत दरम्यान राज्यात जो सत्ता संघर्ष सुरू आहे त्यामध्ये सर्वाधिकार हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत असे मत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे पाठवले जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे
Leave a Reply