बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे.
कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना विरोध करत बजरंग सोनवणे यांना मदत केली होती.
याबाबत खांडे यांची क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये त्यांनी या सगळ्यांची कबुली देताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याची धमकी दिली होती.
या सगळ्या प्रकारांनंतर आता पक्षाने या गोष्टीची दखल घेत खांडे यांची हकालपट्टी केली आहे.
Leave a Reply