News & View

ताज्या घडामोडी

कुंडलिक खांडे यास अटक!
बीड -शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली.

कुंडलिक खांडे यांची एक व्हाईस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल झाला होता.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे याने बजरंग सोनवणे यांचं काम केले होते. याबाबत खांडे यांची एक व्हाईस क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये खांडे ने या गोष्टीची कबुली देतानाच कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.

या क्लिप वरून वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून खांडे विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती.

दरम्यान जामखेड येथे खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *