News & View

ताज्या घडामोडी

बोराडे, पानसबळ, शिंदे, मोमीन यांची चौकशी सुरु!

बीड -बीडचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय असा झाला आहे. बीड व शिरूर तालुक्यातील एफ डि आर च्या कामांची  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र दिन वर्ष अधिकाऱ्यांनी हे प्रकरण लांबवले.मात्र काही दिवसापूर्वी या प्रकारणाची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.

बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांनी बोगस कामांचा सपाटा लावला आहे. पूर किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास रस्ते, पूल, नाल्या यांचे होणारे नुकसान दुरुस्त करण्यासाठी सरकारकडून एफ डि आर च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.

बीड बांधकाम विभागाला देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी येतो. मात्र कार्यकारी अभियंता ते शाखा अभियंता आणि गुत्तेदार मंडळी बोगस कामे दाखवून करोडो रुपयांचा निधी फस्त करतात.

2021-22 या वर्षात बीड आणि शिरूर विभागात बोराडे, शिंदे, मोमीन, पानसंबळ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या जवळच्या गुत्तेदारना कामे दिल्याचे दाखवले आणि कोट्यावधी रुपये हडप केले. याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार झाली. त्यानंतर जे दोषी आहेत, त्यांच्याकडेच चौकशी देण्यात आली.

याबाबत ओरड झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कसेबसे हे प्रकरण मॅनेज केले. मात्र नुकतेच या प्रकरणात नांदेड येथील कार्यकारी अभियंता मुळे यांच्यासह अधिकाऱ्यांचे पथक चौकशीसाठी येऊन गेले. या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत बोराडे, पानसंबलं यांचा मोठा हिस्सा असल्याची चर्चा आहे. शासन स्तरावरून याबाबत कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *