News & View

ताज्या घडामोडी

कुटेंची अटक बेकायदेशीर!

माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट अपहार प्रकरणात अटकेत असलेले सुरेश कुटे यांची अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आगे. त्यामुळे कुटे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यभरात पन्नास पेक्षा जास्त शाखाच्या माध्यमातून लाखभर ठेवीदारांचे तीन साडेतीन हजार कोटी रुपये गोळा करणारे आणि गेल्या आठ महिन्यापासून ठेवीदारांना एक पैसाही न देणाऱ्या सुरेश कुटे यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर गेल्या पंधरा दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने कुटे यांच्यासह त्यांचा भाचा आशिष पाटोदेकर या दोघांना पुण्यातून अटक केली. माजलगाव न्यायालयात हजर केले. तेव्हा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस वेळ घेतला. त्या दरम्यान कुटे यांना घरी नजरकैद मध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान शनिवारी पुन्हा न्यायालयात कुटे यांना हजर केले तेव्हा त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. याबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी सरकारी वकील यांना संपर्क केला होता, मात्र ते कामात असल्याने त्यांनी नंतर बोलतो असे सांगितले.

कुटे प्रकारणात नेमक काय घडलं, न्यायालयाने काय आदेश दिले याबाबत माहिती घेत आहोत, आमचे डिवायएसपी तिकडे गेले आहेत, सविस्तर माहिती नंतर देतो असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *